![]() |
YASHODEEP KNOWLEDGE HUB, CHH. SAMBHAJI NAGARDTE Code: 2567 MSBTE Code: 1807
![]() Webmail Login |
यशोदीप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे, दिनांक 22/01/2025 वार बुधवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष, आदरणीय श्री.चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, श्री.श्याम कुलकर्णी सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विजतंत्री व जोडारी विभागातील सर्व विद्यार्थ्यांना बजाज टाटा स्ट्राईव्ह BMS अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून बजाज टाटा स्ट्राईव्ह चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई मा. श्री अमेय वंजारी सर, व बजाज टाटा स्ट्राईव्ह चे लिड मा. श्री. अभिषेक पाठक सर, दिल्ली, आणि त्यांचे सहकारी श्री.सुदर्शन धारुरकर सर, श्री. मंगेश मोकळ सर,श्री. श्रीपाद कुलकर्णी सर, श्री राठोड सर आदी उपस्थित होते, प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना BMS कोर्स अंतर्गत विविध संकल्पना स्पष्ट करत,ज्या विद्यार्थ्यांनी कमी कालावधी मध्ये कोर्स उत्तम रित्या पूर्ण केले, अशा विद्यार्थ्यांना बक्षीस रुपी बॅच देऊन अभिनंदन केले, यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर व प्राचार्य प्रवीण माळी सर यांचा सत्कार TATASTRIVE BMS तर्फे करण्यात आला व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले, तसेच भविष्य इंडस्ट्रीज कडून विविध प्रकारच्या मदतीने विकसनशील भारताकडे आपण वाटचाल करू असे आश्वासन दिले. यानंतर यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, श्री. प्रविण माळी सर यांनी संस्थेमध्ये सुरू असलेले उपक्रम तसेच इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन बद्दल माहिती दिली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सरांनी स्किल गॅप कमी करण्यासाठी विविध उपाय योजना बद्दल माहिती दिली.
सदरील कार्यक्रमाचे, सूत्रसंचालन श्री.ज्ञानदेव थोरे सर,यांनी केले तसेच संस्थेच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी श्रीमती आरती बांगड मॅडम फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या अमनप्रित कौर मॅडम, एम. सी. ए. कॉलेजचे प्राचार्य श्री राठोड सर तसेच आय.टी.आय विभागातील श्री योगेश क्षीरसागर सर, श्री राहुल डोळस सर,श्री विकास आडे सर, श्री वाघमारे सर, श्री हलगे सर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
धन्यवाद
आज दिनांक 16/01/2025 वार गुरुवार रोजी कै. दामोदर येवले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर संचलित "यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बीड रोड, छत्रपती संभाजीनगर, येथील प्रथम व द्वितीय वर्षातील विजतंत्री व जोडारी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.चंद्रकांतजी येवले सर व प्रशासकिय अधिकारी श्री. श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली "औद्योगिक सहलीचे" आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्याना प्रशिक्षण दरम्यान औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष काम कशा प्रकारे चालते हे दाखवणे हा या सहलीचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी सर्व विद्यार्थांना साखर उद्योग दाखवण्यासाठी "छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना, चित्तेपिंपळगाव येथे घेऊन जाण्यात आले होते. देशातील उद्योगापैकी एक असणारा साखर उद्योग आणि त्याठिकाणी ऊसापासून तयार होणारी साखर निर्मिती प्रक्रिया दाखवण्यात आली, त्यासोबतच को-जनरेशन प्लांट, इथेनॉल प्लांट या उद्योगात उपयोगात आणल्या जाणाऱ्या अत्याधुनिक मशिनरी यांची माहिती श्री केदारे सर (चीफ इंजिनीयर) श्री बलदे सर (जी एम) तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याना दिली, तसेच याठिकाणी असणाऱ्या वीजनिर्मिती केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्याना प्रत्यक्ष वीजनिर्मिती कशा पद्धतीने तयार होते, हे दाखवण्यात आले. या औद्योगिक सहली दरम्यान यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. प्रविण माळी सर, निदेशक ज्ञानदेव थोरे, विकास आडे, श्री योगेश क्षीरसागर सर, श्री राहुल डोळस, श्री वाघमारे सर आदी उपस्थित होते.
धन्यवाद
यशोदीप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे, आज दिनांक 16/01/2025 वार गुरूवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष,आदरणीय श्री.चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, श्री.श्याम कुलकर्णी सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विजतंत्री व जोडारी विभागातील सर्व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि महत्त्व, या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून मा. श्री आनंद कांबळे सर, रस्ता सुरक्षा समन्वय, छत्रपती संभाजीनगर व त्यांचे सहकारी हे उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांना वरील विषयावर महत्वाचे मार्गदर्शन केले यामधे अपघात म्हणजे काय, अपघाताची मूळ कारणे रस्ता सुरक्षा,
वैयक्तिक जबाबदारी, अपघाती मृत्यूचा दर 1.5 ते 2 लाख प्रती वर्ष, दुचाकी द्वारे अपघाती मृत्यूचा दर 44%, पायी प्रवास करताना होणारा अपघाती मृत्यू दर 20%, प्रवास करताना सोबत आवश्यक कागदपत्रे, हेल्मेट चा वापर, आरशाचा उपयोग, गतिरोधक ची आवश्यकता, दोन वाहनातील अंतर, इत्यादी. यानंतर यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, श्री प्रविण माळी सर यांनी प्रमुख पाहुण्याचे आभार व्यक्त करून त्यानंतर शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे,सूत्रसंचालन श्री ज्ञानदेव थोरे सर, यांनी केले तसेच श्री योगेश क्षीरसागर सर, श्री राहुल डोळस सर, श्री विकास आडे सर, श्री वाघमारे सर, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
धन्यवाद
यशोदिप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे, आज दिनांक 13/01/2025 वार सोमवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, "राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि युवा प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमेचे पूजन करून जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाच्या शेवटी मा. प्राचार्य सरांनी राजमाता जिजाऊ यांचे संस्कार आणि स्वामी विवेकानंद यांचे तरुण युवा विषयी असणारे संदेश, हे सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सदरील कार्यक्रम श्री थोरे सर, श्री क्षीरसागर सर, श्री डोळस सर, श्री आडे सर, श्री वाघमारे सर आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला....
यशोदिप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे, दिनांक 06/12/2024 वार शुक्रवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर "यांच्या ""महापरिनिर्वाण" दिनानिमित्त यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी सर यांनी प्रतिमेचे पूजन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी मा. प्राचार्य सरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारा विषयी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सदरील कार्यक्रम श्री थोरे सर, श्री क्षीरसागर सर, श्री डोळस सर, श्री आडे सर, आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला....
यशोदीप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे, आज दिनांक 03/12/2024 वार मंगळवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष,आदरणीय श्री.चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, श्री.श्याम कुलकर्णी सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विजतंत्री व जोडारी विभागातील सर्व विद्यार्थ्यांना अर्थींगचे महत्त्व,सुरक्षितता व काळजी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून मा. श्री बंडू पी.लोणे सर, प्रशिक्षण समन्वयक, महावितरण,RTC, छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांना वरील विषयावर महत्वाचे मार्गदर्शन केले यामधे अपघात म्हणजे काय, अपघाताची मूळ कारणे, अपघाताचे परिणाम,
वैयक्तिक जबाबदारी, अर्थिंगचे प्रकार, अर्थिंग साठी वापरायचे मटेरियल, अर्थ resistance मोजण्याचे पद्धत, अपघाताचे वेगवेगळी उदाहरणे इत्यादी. यानंतर यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, श्री प्रविण माळी सर यांनी प्रमुख पाहुण्याचे आभार व्यक्त करून त्यानंतर शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे,सूत्रसंचालन श्री ज्ञानदेव थोरे सर, यांनी केले तसेच श्री योगेश क्षीरसागर सर, श्री राहुल डोळस सर, श्री विकास आडे सर, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
धन्यवाद.
यशोदीप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे, आज दिनांक 28/11/2024 वार गुरूवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष,आदरणीय श्री.चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, श्री.श्याम कुलकर्णी सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विजतंत्री व जोडारी विभागातील सर्व विद्यार्थ्यांना (NAPS) National Apprenticeship Pramotion Scheme व (MAPS) Maharashtra Apprenticeship Pramotion Scheme च्या अंतर्गत ITI पूर्ण झाल्यानंतर Apprenticeship करतांना भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभ (भत्ता), Apprenticeship साठी आवश्यक पात्रता व इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून मा.श्री. बालाजी म्हस्के सर, प्रशिक्षण समन्वयक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले. यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, श्री प्रविण माळी सर यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करून त्यांच्या कार्याबद्दल भावना व्यक्त केल्या, त्या नंतर शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सदरील कार्यक्रमास, सूत्रसंचालन श्री ज्ञानदेव थोरे सर, यांनी केले तसेच श्री योगेश क्षीरसागर सर, श्री राहुल डोळस सर, श्री विकास आडे सर, श्रीमती मेघा मुलगीर मॅडम, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
धन्यवाद.
यशोदिप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे,आज दिनांक 11/10/2024 वार शुक्रवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक पद्धतीने, संस्थेमधील सर्व मशीन, साहित्य, शस्त्र इत्यादींचे प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी,श्रीमती आरती बांगड मॅडम, डी.फार्मसी प्राचार्या श्रीमती कौर मॅडम, यांच्या हस्ते पूजन करून, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त म्हणजेच विजयादशमी (दसरा) सण उत्साहाने संस्थेमध्ये साजरा करण्यात आला आहे, त्या निमित्त यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी सर यांनी पूजन करून विजयादशमी व दसरा, निमित्त शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रम श्री थोरे सर, श्री योगेश क्षीरसागर सर, श्री राहुल डोळस सर, श्री विकास आडे सर, मेघा मुलगीर मॅडम, आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. धन्यवाद
यशोदिप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे, आज दिनांक 05/09/2024 वार गुरूवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, "खरे शिक्षक ते आहेत जे आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतात". असे शिक्षकाविषयी मत मांडणारे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. श्री थोरे सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिना विषयी थोडक्यात माहिती दिली, कार्यक्रमाच्या शेवटी मा. प्राचार्य सरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारा विषयी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत देखील केले सदरील कार्यक्रमास श्री थोरे सर, श्री क्षीरसागर सर, श्री डोळस सर, श्री आडे सर, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला....
यशोदिप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 08/08/2024 वार गुरूवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली,द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांकरिता "स्मृती प्रकाश (निरोप समारंभ) सोहळा 2024 " कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली, त्यामध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त करून, दोन वर्षातील प्रशिक्षण कालावधीत साठवलेल्या आठवणींवर प्रकाश टाकून उजाळा दिला, यशोदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या प्राचार्या अमनप्रीत कौर मॅडम व उपप्राचार्य शितल पांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या त्यानंतर यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले, त्यानंतर संस्थेचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी श्रीमती आरती बांगड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता श्री थोरे सरांनी केली.सदरील कार्यक्रमात, श्री विकास आडे सर,श्री योगेश क्षीरसागर सर,श्री राहुल डोळस सर,मेघा मॅडम,श्री हालगे सर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला...
आज दिनांक 19/04/2024 वार शुक्रवार रोजी यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बीड रोड, छत्रपती संभाजीनगर. येथील संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर व प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आरती बांगड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी सर यांच्या उपस्थितीत "WOCKHARDT Pvt Ltd, Shendra MIDC,Chh. Sambhajinagar अंतर्गत" मुलाखतपूर्व विद्यार्थ्यांशी संवाद" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यामध्ये कंपनीचे अधिकारी राऊत सर, जाधव सर व महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना "आय.टी.आय. विद्यार्थ्यांचा औषधनिर्माण कंपनीमधील रोल" याविषयी मार्गदर्शन करून त्यांना पुढील करिअर मधील संधी निदर्शनास आणून दिल्या तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेतील शिक्षक वृंद श्री ज्ञानदेव थोरे, श्री विकास आडे, श्री योगेश क्षीरसागर, श्री राहुल डोळस, मेघा मुलगीर व आदी कर्मचारी यांनी सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार.
धन्यवाद.
Principal,
Pravin B.Mali
Yaahodeep Industrial Training Institute, Chh. Sambhajinagar 431 007
आज दिनांक 19/03/2024 वार मंगळवार रोजी यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बीड रोड, छत्रपती संभाजीनगर. येथील संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर व प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आरती बांगड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी सर यांच्या उपस्थितीत "Bajaj TaTa strive BMS अंतर्गत"-Project Exhibition आयोजित करण्यात आले होते, यामध्ये विद्यार्थ्यांनी 5-S संकल्पनेशी निगडीत उत्तमरित्या प्रकल्प सादरीकरण करून आपापल्या संकल्पना सादर केल्या. याची पाहणी करण्यासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी,श्री श्याम कुलकर्णी सर,आय टी आय विभागाचे प्राचार्य,श्री प्रविण माळी सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून टाटा स्ट्राईव्ह प्रोजेक्टचे कॉर्डिनेटर्स श्री मंगेश मोकळ सर व श्री किशोर सुतार सर यांची उपस्थिती होती. हे सर्व प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संस्थेतील शिक्षक वृंद श्री ज्ञानदेव थोरे, श्री विकास आडे, श्री योगेश क्षीरसागर, श्री राहुल डोळस, मेघा मुलगीर व आदी कर्मचारी यांनी सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार.
धन्यवाद.
Principal
Pravin B.Mali
Yaahodeep Industrial Training Institute, Chh. Sambhajinagar
आज दिनांक 23/02/2024 वार शुक्रवार रोजी कै. दामोदर येवले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर, संचलित "यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बीड रोड, छत्रपती संभाजीनगर, येथील प्रथम व द्वितीय वर्षातील विजतंत्री व जोडारी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.चंद्रकांतजी येवले सर, यांच्या मार्गदर्शनाखाली "औद्योगिक सहलीचे" आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्याना प्रशिक्षण दरम्यान औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष काम कशा प्रकारे चालते हे दाखवणे हा या सहलीचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी सर्व विद्यार्थांना Sydler Electronics pvt Ltd आणि Rucha Engineering Pvt Ltd Waluj MIDC chh. Sambhajinagar, येथे घेऊन जाण्यात आले होते. वाहन उद्योगातील थ्री आणि टू व्हीलर चे सायलेन्सर, बॉडी ट्रे, जॅक , तसेच विद्युत क्षेत्राशी निगडित कंट्रोल पॅनल बोर्ड इत्यादी , या सर्वाची महिती या ठिकाणी , विद्यार्थ्याना देण्यात आली, माहिती देणारे , श्री रोडगे सर (क्वालिटी हेड) श्री वैभव सर (एच आर) आणि श्री काळे सर (प्रोडक्शन हेड) तसेच, या औद्योगिक सहली दरम्यान संस्थेचे प्राचार्य श्री. प्रविण माळी सर, निदेशक ज्ञानदेव थोरे, विकास आडे, योगेश क्षीरसागर, राहुल डोळस आणि मेघा मॅडम आदी उपस्थित होते.